कृषी सेवक I १४ डिसेंबर २०२२ I देशातील कापूस दर एका भावपातळीवर स्थिर आहेत. कापसाला आज सरासरी ८ हजार ६०० ते ९ हजार ४०० रुपये दर मिळाला. एरवी डिसेंबर महिन्यात कापसाची आवक जास्त असते.
मात्र यंदा शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचे नियोजन करून आवक मर्यादीत ठेवली. त्यामुळं दर टिकून आहेत. शेतकऱ्यांनी महिनाभर हेच धोरण कायम ठेवल्यास कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम