कृषी सेवक I १४ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र देशातील सोयाबीन दर आजही स्थिर होते.
सोयाबीनचे भाव ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयांपर्यंत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारल्यास देशातील सोयाबीनलाही आधार मिळेल. यंदा शेतकऱ्यांना सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये दर मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम