Crop Loan: वाढत्या उत्पादन खर्चामुळे खरीप पीक कर्जात वाढ; सोयाबीनसाठी कर्ज रक्कम कमी

बातमी शेअर करा

सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांसाठी हेक्टरी कर्ज रकमेत वाढ केली आहे. बँका बाजरी, मका, सूर्यफूल, तूर, भुईमूग यांसारख्या पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्यास तयार आहेत. उसासाठी सर्वाधिक हेक्टरी एक लाख 32 हजार 700 रुपये कर्ज बँका देणार आहेत.

पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांची लागवड कठीण होती. मात्र, सिंचनाच्या वाढत्या सुविधांमुळे व पिकविमा कंपन्यांच्या मदतीमुळे शेतकऱ्यांनी खरीप क्षेत्रात वाढ केली आहे. राज्य शासनाने वाढत्या उत्पादन खर्च लक्षात घेऊन कर्ज धोरणात बदल केला आहे, ज्यामुळे पिकांना अधिक कर्ज मिळू शकते.

सोयाबीनसाठी कर्ज रक्कम कमी

पाच वर्षांपूर्वी बार्शी व अक्कलकोट तालुक्यात सुरू झालेल्या सोयाबीन पिकासाठीही बँका कर्ज देत आहेत. मागील वर्षी सोयाबीनसाठी हेक्टरी 49,500 रुपये कर्ज दिले जात होते, परंतु यावर्षी ते कमी करून 36,400 रुपये करण्यात आले आहे. जिरायत सोयाबीनसाठी हेक्टरी 34,400 रुपये कर्ज मिळणार आहे.

(ही कर्ज रक्कम हेक्टरी व बागायती आहे. जिरायत पिकासाठी कर्जमर्यादा प्रत्येक पिकासाठी यापेक्षा कमी आहे.)

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना

बँका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पीककर्ज देत आहेत. वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून सहज कर्ज मिळते. शेतकऱ्यांनी पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी आणि कर्ज मिळण्यासाठी जिल्हा सहकारी बँक आणि आपल्या गावच्या दत्तक बँकेशी संपर्क साधावा. – दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम