कवडापालन : मिळवा जास्त उत्पादन

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ५ डिसेंबर २०२२ I कुक्कुटपालन हा ग्रामीण भारतातील मोठ्या प्रमाणात करण्यात येणारा एक जोडधंदा आहे. अनेक शेतकरी शेतीसोबतच कोंबड्यांचे पालनपोषण करतात, तर अनेकजण बिझनेस म्हणून पोल्ट्री फार्म सुरू करतात. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. पण आणखी असा एक पक्षी आहे ज्याची अंडी कोंबडीच्या अंड्यांपेक्षा महाग आहेत. पण तो पक्षी ठेवण्यासाठी तुमच्याकडे सरकारचा अधिकृत परवाना असणे आवश्यक आहे.

फार कमी लोकांना या बद्दल माहिती असेल की कवडा नावाचा पक्षी ग्रामीण भागात आणि जंगलात आढळतो. या पक्ष्याला हिंदीत तीतर असे म्हणतात. हा पक्षी एका वर्षात सुमारे 300 अंडी देतो. कुक्कुटपालनापेक्षा कवडापालन केल्याने तुम्ही जास्त नफा मिळवू शकता.

का लागतं लायसन्स?

कवडा हा जंगली पक्षी आहे. याचे मांस अतिशय चविष्ट असते आणि खवैये याचे मास मोठ्या आवडीने खातात म्हणून याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. सध्या या पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. या कारणास्तव भारत सरकारने त्याच्या शिकारीवर बंदी घातली आहे. कवडा पाळायचा असेल तर सरकारकडून तुम्हाला अधिकृत परवाना घ्यावा लागेल.

साधारण हा पक्षी जन्मानंतर 45 ते 50 दिवसांत अंडी द्यायला सुरुवात करतो. त्यांचा व्यवसाय फार कमी वेळात व कमी पैशात सुरू करता येतो. हा व्यवसाय करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देखील करते. असे केल्याने पक्ष्यांची संख्याही वाढेल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल.

अन्न आणि जागेची गरज कमी

कवडा पक्ष्यांचा आकार लहान व वजन कमी असल्याने त्यांना अन्न व जागाही कमी लागते. व्यवसायासाठी गुंतवणूकही खूप कमी आहे. केवळ 4-5 कवडा पक्षी पाळून व्यवसाय सुरू करता येतो. त्याचे मांसही बाजारात कोंबडीपेक्षा चांगल्या दराने विकले जाते. ज्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

कवडा पक्ष्याची अंडी विविधरंगी असतात. त्यात कार्बोहायड्रेट, प्रथिने, फॅट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. अंड्यातील पिवळ बलक मध्ये प्रति ग्रॅम 15 ते 23 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. अनेक प्रकारच्या आजारांमध्ये कवडा पक्ष्याची अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम