काकडी व कलिंगड (टरबुज) लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | वेल वर्गीय पिकांची लागवड करताना सुधारित जातींची निवड करावी.काकडी आणि कलिंगड हे नगदी पीक समजले जाते.

काकडी लागवड
ह्या पीकाची लागवड जुन ते फेब्रुवारी महीन्यात करावी.
मार्च, एप्रिल, व मे महीन्यात शक्य तो लागवड करु नये.
उन्हामुळे काकडी कडु लागते.
हीवाळ्यात काकडी लागवड मल्चींग पेपर वर करावी, उत्पन्न चांगले मिळते.
कलींगड लागवड डिसेंबर,जानेवारी मध्ये करावी.
अगष्टा,आयशा (काळे गोल)
शुगर किंग(काळे लंब गोल)
नामधारी , ड्रिंग कींग (पट्टा ) 70 दिवसात निघणारे

या सुधारित जातीची निवड करावी.

भेसळ ढोस

प्रति एकर

18×46×00 = 1 कुंटल
पोटॅश =50 कीलो
लिंबोळी पेंड = 1 कुंटल
सुक्ष्म अन्न द्रव्य= 10 किलो
दुय्यम अन्न द्रव्य =20कीलो
ह्युमिक = 5 किलो
थायमिट = 5 किलो

1)सुक्ष्म अन्न द्रव्य=(मायक्रोन्युटन)
झिंक, बोराॅन ,काॅपर
2)दुय्यम अन्न घटक=
कॅल्शियम ,मॅग्निशयम,पोटाशियम, सल्फर

हा ढोस बेड वर टाकुन चागंला माती मध्ये मिसळुन घ्यावा..
मलचींग अंथरुन “झिक झ्याक” पध्दतीने लागवड करावी..

लागवडी नंतर
ड्रिप खत नियोजन=}
हालक्या जमिनी साठी एक दिवसा आड पाणी द्यावे,भारी जमिनीला दोन दिवसा आड पाणी द्यावे.

10 दिवसा पासुन 35 दिवसा पर्यंत
19×19×19
प्रति एकरी 2 किलो.
युरिया 2 किलो.
——————
35 दिवसा पासुन 50 दिवसा पर्यंत
12×61×00
प्रति एकरी 2 किलो.
——————
50 दिवसा पासुन 75 दिवसा पर्यंत
00×52×34 किंवा 13×00×45
प्रति एकरी 2 किलो
—————-
75 दिवसा पासुन 90 दिवसा पर्यंत
00×00×50
प्रति एकरी 3 किलो.

तसेच एका महिन्यात 2 वेळा बोराॅन= 500 ग्रामकॅल्शियम=5 किलोमॅग्निशियम =5 किलोसोडणे गरजेचे आहे.

फवारणी नियोजन

वेल वर्गीय पीकांवर फवारणी नियोजन सर्वात महत्वाचे आहे.
रोग-}नाग आळी, भुरी, डावणी, फळ माशी,तसेच मर रोग

हे रोग जास्त प्रमाणात पहायला मिळतात.

1) नाग आळी
लक्षणे-पानांवर नागमोडी पांढर्या रेषा दिसणे.
उपाय-
अपोलो 7 (दमन) = 15 ml
डेक = 25 ml
निंबीका + 10000 ppm=20 ml

2)भुरी
लक्षणे- पानांवर पाढर्या रंगाची पावडर जमा होणे.
उपाय-
टिल्ट = 10 ml
बेनोमिल = 15 ग्राम
कॅप्टन= 15 ग्राम

3)डावणी
लक्षणे-वेल पीवळी होऊन
शेंड्याची पाणे बारीक होतात.
उपाय-
कॅब्रीओटाॅप= 45 ग्राम
डिफ्लोमिल (दमन)= 45 ग्राम
नेटिओ (बायर)= 10 ग्राम

4)फळ मशी
लक्षणे-काकडी वाकडी व कलिंगड चेपटे तसेच माशी बसलेल्या जागेवरती दु:ख होते.
तसेच ती जागा सपरचंदाच्या देटा सारखी आत जाते.
फळ माशी नियंञण उपाय-
1)मक्षिकारी + नुवान- एकरी दहा कापसाचे बोळे ठेवावे.
2)एकरी सहा कामगंध सापळे लावावेत.

5)मर रोग
लक्षणे-वेली करपुन जळायला लागतात.
उपाय-
क्लोरो 20% = 2 लिटर त्याबरोबर ट्रायक्रोड्रामा= 1 किलो कींवा डिट्टो 500 ग्राम प्रति एकरी सोडावे.

शेतकरी मिञांनो हे दोन्ही पीकं कमी कालावधीत चांगला नफा देणारे पिक म्हणुन यांची ओळख आहे.

काकडी चे सरासरी एकरी 20 टन उत्पन्न मिळते.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम