कृषी सेवक | १३ नोव्हेंबर २०२२ | टोमॅटोला नाशिक तालुक्यातील गिरणारे, नाशिक मार्केटमध्ये प्रति कॅरेट केवळ 70 ते 100 रुपये भाव मिळाला. यावर्षीचा हा सर्वात कमी भाव असून एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्चून हाती काहीही लागले नाही. मशागतीपासून रोपे, लागवडीचा खर्च, तार बांबूचा बेसुमार खर्च, कीटकनाशके, खते यासाठी चारपट खर्च करून अतिवृष्टीत नैसर्गिक संकटात वाचवलेले व डोईजड मजुरी पेलत हाती येणार पीक मातीमोल भावात विकले जात असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यंदा सर्वत्र अतिवृष्टीने खरिपाचे अति नुकसान झाले. या अतिवृष्टीतही नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी भागात मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड करण्यात आली. पावसाळी हवामानात नैसर्गिक असमतोल असतांना शेतकर्यांनी कीटकनाशके खते यावर तीनपट खर्च केला. अतिवृष्टीतून पोटच्या पोरागत टिकवलेल्या टोमॅटोला सुरुवातीला हजार ते बाराशे भाव होता. मात्र दिवाळीच्या ऐन मोसमात भाव पडायला लागले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम