सुधारित पद्धतीने करा ‘खरबूज’ लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | या वनस्पतीची लागवड प्रामुख्याने उत्तर प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र येथे केली जाते. महारष्ट्रात हे पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात घ्यायचे, परंतु आता हे पिक बागायती पिक म्हणून घेतले जाते.

सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये खरबुजाची लागवड करता येते. चुनखडीयुक्त, खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अति प्रमाणात असणार्‍या कॅल्शियम सल्फेट क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे खरबूज फळांवर डाग पडण्याची शक्यता असते.

paid add

खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुगंध असतो. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे व अ, ब, क जीवनसत्वे काही प्रमाणात असतात. कच्या खरबूजाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. खरबुजाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते.
खरबूज हे सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळपीक असून वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. कमी खर्चात, कमी पाण्यावर व ९० ते १०० दिवसांमध्येच येणारे मधुर, गोड, स्वादिष्ट असे फळपिक असल्याने सध्या या पिकाच्या लागवडीस खूप वाव आहे

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम