वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची विज कापण्याचा निर्णय

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २७ नोव्हेंबर २०२२ I शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार नेहमीच काही ना काही प्रयत्न करत असत. तसेच वेगवेगळे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत. अनेकदा शेतकऱ्यांना शेतीसाठीलागणाऱ्या विजेचे बिल भरण्यास काही कारणास्तव विलंब होतो. शेतीत नफा न मिळाल्याने हे वीज बिल तसेच थकित राहते आणि महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज कापली जाते. शेतकऱ्यांचे हेच नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी विज न कापण्याचा निर्णय घेतला होता.

paid add

देवेंद्र फडणवीस यांनी चालू वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचीवीज न कापण्याचे निर्देश दिले होते. तसेच महावितरण सध्या प्रचंड अडचणीत आहे. त्याचमुळे महावितरणला शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसुली केल्याशिवाय मार्ग नाही. त्यामुळे महावितरणने चालू वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची विज कापण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम