साखर उत्पादनात घट

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २० नोव्हेंबर २०२२ | पश्चिम भारतात पावसामुळे साखर कारखान्यांची धुराडी उशिरा पेटली. त्यामुळे गाळप हंगाम सुरू व्हायला उशीर झाला. त्याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे.

 

चालू साखर हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या हंगामाच्या पहिल्या ४५ दिवसांत साखर उत्पादनात किंचित घट झाली आहे. या काळात १९.९ लाख टन साखर उत्पादन झालंय. गेल्या वर्षी याच कालावधीत २०.८ लाख टन उत्पादन झालं होतं. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने म्हणजे इस्माने ही माहिती दिलीय. तसेच आतापर्यंत ३५ लाख टन साखर निर्यातीसाठीचे करार झाले आहेत. त्यापैकी फक्त २ लाख टन साखर ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्षात निर्यात झालीय.

 

paid add

गेल्या वर्षी याच कालावधीत ४ लाख टन साखर निर्यात झाली होती. केंद्र सरकारने साखर निर्यात धोरण जाहीर करण्याआधीच अनेक व्यापाऱ्यांनी साखर निर्यातीचे करार करून टाकले होते. मधल्या काळात साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे आता साखर कारखान्यांनी निर्यात दराच्या बाबतीत नव्याने वाटाघाटी करायला सुरूवात केलीय, असंही इस्मानं म्हटलंय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम