खरीप मक्याचे देशातील उत्पादन २३१ लाख टन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २० नोव्हेंबर २०२२ | छिंदवाडा हे मध्य प्रदेशातील मार्केट मक्यासाठी प्रसिध्द आहे. तिथे मक्याच्या किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. परंतु नंतरच्या टप्प्यात किमतीत सुधारणा झाली.

 

गेल्या आठवड्यात स्पॉट किमती १.६ टक्क्यांनी वाढून प्रति क्विंटल २,१७१ रूपयांवर पोहोचल्या. चालू आठवड्यात त्या १.३ टक्क्यांनी वाढून २,२०० रूपयांवर गेल्या. मक्याची किमान आधारभूत किंमत म्हणजे हमीभाव १९६२ रूपये आहे. फ्युचर्स मार्केटमध्येही दरवाढीचा कल आहे.

 

फ्युचर्समध्ये डिसेंबर डिलिवरी किमती रु. २,२८५ वर आल्या आहेत. यंदा खरीप मक्याचे देशातील उत्पादन २३१ लाख टन राहील, असा केंद्र सरकारचा अंदाज आहे. हे उत्पादन विक्रमी ठरेल. परंतु मक्याची मागणी वाढती आहे. विशेषतः पशुखाद्यासाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे दराला आधार मिळेल, असे सध्याचे चित्र आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम