शेतकऱ्यांच्या पदरी निराशा : फुले विकून खर्च निघाला नाही !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २७ ऑक्टोबर २०२३

दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्रीसाठी झेंडू फुले घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी छत्रपती संभाजीनगरात निराशा पडली असून दसऱ्याच्या आदल्या दिवशी ३० ते ४० रुपये प्रति किलोने विकला गेलेला झेंडू दसऱ्याच्या दिवशी पाच ते दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली घसरला. एवढेच नाही तर अनेक झेंडू विक्रेते यांनी विकण्यापेक्षा तसाच फुलाचा गंज सोडून जाणेच पसंत केल्याची स्थिती पाहायला मिळाली.

यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत आहे. त्यामुळे रब्बीची आशा मोठ्या प्रमाणात धूसर होत चालली आहे. असे असताना यंदा मोठ्या प्रमाणात झेंडू फुल शेती नवरात्र, दसरा, दिवाळी या अनुषंगाने फुल उत्पादकांनी केली. दररोज झेंडूच्या विक्री मध्ये शेतकऱ्यांना २० ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे दर दसऱ्यापर्यंत मिळाले आहेत.

नवरात्र बरोबरच दसऱ्याला झेंडू फुलांची विशेष महत्त्व असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांची थेट विक्री करण्याचा मार्गही निवडला. परंतु हा मार्ग त्यांच्यासाठी नुकसानीचा ठरल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाड्याच्या विविध जिल्हासह विदर्भातील काही जिल्ह्यातून झेंडू फुलांची मोठी आवक झाली होती. दसऱ्याच्या आदल्या दिवशी झेंडू फुलांना ३० ते ४० रुपये प्रति किलोचा दर मिळाला होता.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम