सोयाबीनची कापणी कशी करावी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २८ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक शेतकरी सोयाबीनचे पीक घेत असतात. पण अनेकदा शेतकरी पिक घेवून त्याची काढणी करण्यासाठी अचूक नियोजन करीत नसल्याने अनेकांना याचा फटका बसत असतो. योग्य वेळी जर सोयाबीनची काढणी केली नाही तर बियाण्यांची प्रत खालावण्याची शक्यता असते. बरेच शेतकरी सोयाबीन पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरतात.  सोयाबीन बियाण्याचे आवरण हे अत्यंत पातळ व नाजूक असते. त्यामुळे इतर पिकाच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर खराब होऊ शकते. त्याचा उगवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

paid add

सोयाबीनची पाने पिवळी पडून गळू लागल्यावर आणि शेंगाचा रंग भुरकट, तांबूस किंवा काळपट झाल्यानंतर पीक कापणीला आलय अस समजाव. वाणाच्या पक्वतेनुसार साधारणत: ८० ते ८५ टक्के शेंगा वाळल्यानंतर पिकाची कापणी करावी. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ ते १७ टक्के असाव. सोयाबीनची पाने पिवळसर होऊन शेंगा तांबूस रंगाच्या झाल्यानंतर दाण्यातील ओलावा १५ ते १७ टक्के झालाय असं समजाव. पावसाचे वातावरण असल्यास किंवा वातावरणात जास्त ओलसरपणा असल्यास सोयाबीनची कापणी टाळावी. कापणी झाली असल्यास गंजी ताडपत्रीने व्यवस्थितपणे झाकावी.  दुपारच्या वेळी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास ताडपत्री काढून गंजी फोडून सुकू द्यावी. त्यामुळे शेंगेतील दाणे कुजणार नाहीत. वाण व प्लॉटनिहाय वेगवेगळी कापणी व मळणी करावी.ओल्या झाडांची गंजी लावू नये. गंजीमध्ये ओले किंवा हिरवे झाडे ठेवू नयेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम