ऊस खोडव्याचे असे करा व्यवस्थापन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ | सध्या कारखाने सुरू झाले आहेत. यामुळे आता कमी खर्चात निघणाऱ्या खोडव्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी उसाची तोडणी देखील व्यवस्थित होणे गरजेचे आहे.

 

तळापासून बुडखे न छाटल्यामुळे जोमदार फुटवे फुटत नाही. खोडव्यासाठी जास्त फुटवे फुटणाऱ्या जातींची निवड केली जात नाही. खोडवा पिकासाठी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अपुरा पुरवठा केला जातो. बुडख्यावरील पाचट बाजूला केले जात नाही.

 

तसेच खोडवा पिकातील पाचट व्यवस्थापनामुळे जमिनीवर अच्छादन होऊन ओलावा टिकून राहतो. पाण्यामध्ये बचत होते. पाण्याची कमतरता असल्यास पीक तग धरण्यास मदत होते आणि सेंद्रिय कर्ब वाढतो.

तसेच उसातील अंतर २ फुटापेक्षा जास्त असल्यास मधल्या मोकळ्या जागेत रोपांची लागवड करावी. उसाचे उत्पादन हेक्टरी १५० टन आणि ऊस संख्या ८० हजारांपेक्षा जास्त आहे अशा उसाचा खोडवा ठेवावा.

 

तसेच फुटव्यांची क्षमता जास्त असलेल्या जातींची निवड करावी. उदा. को ८६०३२, फुले २६५, फुले १०००१, फुले ११०८२, फुले ऊस १५०१२ या जातीचा खोडवा ठेवावा. यामुळे तुमचे उत्पादन वाढेल.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम