सेवानिवृत्तीनंतर करा ही शेती मिळणार भरघोस उत्त्पन्न !

बातमी शेअर करा

कृषीसेवक| २५ ऑगस्ट २०२३ | देशातील अनेक शेतकरी धान्याची मोठ्या प्रमाणात शेती करीत असून त्यांना मोठे उत्पन्न वार्षिक मिळत असते. पण याच्यात फळबागची शेती केल्यास मोठे उत्त्पन्न देखील येवू शकते. आता शेतीची कास धरून लाखो रुपयांचे उत्पन्न काढत आहे. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने शेती करून लागवड करत आहे. खजूर, पेरू, लिंबू, तरबूज, खरबूजसह अन्य उत्पादने काढत आहे. मुकेश मांजू हे राजस्थानातील पिलानीचे रहिवासी आहेत. पूर्वी मुकेश एनएसजी कमांडो होते.

२०१८ मध्ये सेवानिवृत्तीनंतर मुकेश यांनी जैविक पद्धतीने शेती करणे सुरू केले. यातून त्यांचे उत्पादन वाढले. सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांनी वडिलांना मदत करणे सुरू केले होते. आधुनिक पद्धतीने त्यांनी शेतीची सुरुवात केली. त्यांनी आपल्या शेतीत लिंबू, बोर आणि खजूरासह अन्य फळ लावलीत. खजूर शेतीत त्यांना सरकारकडून अनुदानही मिळाले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम