‘या’ फुलाची शेती कराल तर मिळणार अनुदान !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २५ ऑगस्ट २०२३ | देशभरातील शेतकरी अनेक शेती करीत असतो त्यातील काहीना मोठा फायदा होतो तर काही मात्र निराश झालेले असतांना त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. सध्या अनेक शेतकरी फळशेती आणि फुलशेती लागवड करताना दिसत आहेत. फुलशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च देखील येतो. मात्र याच दरम्यान बिहार सरकारने पावसाळ्यात शेतकऱ्यांकडून पिकवल्या जाणाऱ्या फुलांच्या लागवडीसाठी मोठी घोषणा केली आहे. चलातर मग जाणून घेऊया याबाबत माहिती.

बिहार सरकारने फुलांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी भेट जाहीर केली आहे. ज्यामध्ये झेंडूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 70 टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. शेतकऱ्यांना फुलांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे त्यांचे ध्येय असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांचे उत्पन्नही वाढणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत बिहार सरकार ही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे. सरकार त्याच्या लागवडीसाठी 40000 रुपयांच्या खर्चावर 70 टक्के म्हणजे सुमारे 28000 रुपये अनुदान देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बिहारमधील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. जो कोणी शेतकरी त्याची लागवड करतो आणि त्याच्याशी संबंधित लाभ घेऊ इच्छितो, सर्वप्रथम, तुम्हाला बिहार सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संबंधित नोंदणी फॉर्म भरावा लागेल, सर्व पर्याय भरल्यानंतर, तुम्ही ते सबमिट कराल. त्यांनतर तुम्हाला यासाठी अनुदान दिले जाईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम