असे करा कपाशीचे खत व्यवस्थापन

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ४ डिसेंबर २०२२ I जास्त उत्पादन घेण्यासाठी योग्य पद्धतीने कपाशीचे व्यवस्थापन झालं पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. यामध्ये खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे. कापसाचे खत व्यवस्थापन कसे करावे हे या लेखात जाणून घेऊया.
कापसाचे खत व्यवस्थापन

कपाशीला एकरी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 50 किलो पालाश शिफारस केली गेलेली आहे. परंतु, त्यासोबत कापूस तेलवर्गीय पीक असल्याने, कापसाला गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची NPK सोबत गरज असते. नेहमी कापूस आणि सोयाबीनचे पिके घेतल्यामुळे जमिनीतील गंधक कमी झालेले असते, त्यासाठी रासायनिक गंधक खत देणे गरजेचं आहे.

कपाशी लागवडीच्या 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान खत देणे आवश्यक आहे. यामध्ये आपण एकरी एक बॅग 10:26:26+ 10 किलो गंधक किंवा एकरी एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट (दाणेदार) 25 किलो नत्र+ 25 किलो पोटॅश किंवा एकरी एक बॅग 20:20:0:13 किलो पोटॅश घेऊ शकता.
कपाशी लागवडीच्या 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान एकरी एक बॅग डीएपी + 25 किलो पोटॅश + सुक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो असे खताचे व्यवस्थापन करावे.
कपाशी लागवडीनंतर 65 व्या दिवशी एकरी दाणेदार एक बॅग + एक युरिया बॅग + 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट असे खत व्यवस्थापन करावे.
कपाशी लागवडीच्या 90 दिवसांनंतर कपाशीला नत्राची गरज असल्यामुळे एकरी एक युरिया खत द्यावे.
अशाप्रकारे शेतकरी कापसाचे खत व्यवस्थापन करू शकता. यामुळे कपाशीच्या उत्पादनात वाढ होईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम