शेतात पाईपलाईनसाठी इतके मिळते अनुदान

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ४ डिसेंबर २०२२ I शेतकऱ्याना शेतामध्ये पाईप लाईन नेण्यासाठी खूप खर्च येत असतो. त्यामुळे त्यांना खूप आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते.

त्या साठी शासनाने शेतकऱ्यांसाठी पाईप लाईन करण्यासाठी 50% ते 15 हजार रु पर्यंत अनुदान हे देत असते. चला तर बघू या या योजनेसाठी कोणते कागदपत्रे व पात्रता लागतात.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्याना किती टक्के या अनुदान हे देण्यात येणार आहे. याची माहिती घेऊया शासनाच्या माहिती नुसार या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्याना 50% ते 15 हजार रु एवढे अनुदान देणार आहे. या योजनेअंतर्गत एचडीएफ तसेच पीव्हीसी पाईप लाईन साठी शासन अनुदान देणार आहे.

मित्रांनी हा अर्ज आपल्याला सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर भरायचा आहे. अर्ज भरताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की अर्ज करत असताना तुमच्याकडे. असणारा सिंचनाचा स्रोत याबद्दल ची माहिती अर्जामध्ये तुम्हाला प्रविष्ट करायची आहे.

म्हणजेच शेततळे , विहीर किंवा इतर कोणत्या पद्धतीने तुम्ही तीन जण करत आहात. त्याबद्दल माहिती तुम्हाला अर्धा मध्ये प्रविष्ट करावी लागणार आहे.
पाईप लाईन अनुदान योजना 2022

अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी सरकारकडून महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते. या जाहीर केलेल्या लॉटरी मध्ये आपले नाव असेल तर समजून जा की आपल्याला या योजनेचा शंभर टक्के लाभ मिळाला आहे. मग त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार

जमिनीचा सातबारा
8अ
बँकेचे पासबुक
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या ठिकाणी खरेदी करणार आहोत. त्या दिवशी कोटेशन दुकानदाराने दिलेली बिल अपलोड करावे लागणार आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम