देशात मक्याला हमीभावापेक्षा कमी दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | देशात नव्या मक्याची आवक सुरु असून त्याला यंदा केंद्र सरकारनं मक्यासाठी १ हजार ९६२ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र नव्या मक्यामध्ये ओलावा अधिक येत असल्यानं दर हमीभावापेक्षाही कमी मिळत आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नवा मका बाजारात येत आहे नव्या मक्याची आवक आता सुरु झाली. असून १५ ते २० दिवस देशातील बहुतेक भागांमध्ये पाऊस झाल्याने मक्याची काढणी रखडलेली आहे. तर काही ठिकाणी मका सुकविण्याचे काम सुरु आहे.

देशातील बाजारांमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत मका दरात तेजी होती. मात्र आता मक्याचे दर वाढल्याने पशुखाद्यात तांदूळ आणि बाजरीचा समावेश वाढला होता. त्यामुळं मक्याला उठाव कमी होऊन दर घटले. नव्या मक्यामध्ये ओलावा जास्त असल्यानं या मक्याला प्रतिक्विंटल १६०० ते २ हजार रुपये दर मिळत आहे. जूना मका प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयाने बाजारात विकला जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम