शेतातून मुळासकट लव्हाळा संपवा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ | लव्हाळा तणाच्या या गाठी आपोआप पुढे सरकत जातात व त्यांची साखळी तयार होऊन येते पूर्ण क्षेत्र काबीज करते. यामुळे आपण आपल्या पिकाला जेव्हा पाणी देतो तेव्हा पिकापर्यंत हे तन पाणी पोहोचू देत नाही.
लव्हाळा तणनाशक फवारणी

याच बरोबर शेतात रासायनिक खतांचा वापर केल्यावर जमिनीत पडलेल्या खताचा जास्त वापर लव्हाळा करतो. याच्या गाठी खत शोषून घेतात.

पिकावर याचा मोठा परिणाम होतो लव्हाळ्याचा नायनाट करण्यासाठी तसेच पिकावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी. बाजारात धानुका कंपनीचे स्यांप्रा हे तन नाशक उपलब्ध आहे.

हे तन नाशक अमिनो आम्लाचे नाश करते त्यामुळे लव्हाळ वाढीसाठी उपयुक्त असणारे प्रथिने तयार होत नाहीत. व लाव्हाळ्याची वाढ होणे बंद होते यानंतर लव्हाळा पीक पिवळसर व काळा पडतो.

14 ते 15 दिवसात लव्हाळ्याचा पूर्णपणे नायनाट होतो. या तणनाशकाची फवारणी करण्या अगोदर जमिनीला पाणी द्यावे व यानंतर फवारणी करावी तसेच फवारणी. नंतर 14 ते 15 दिवसांनी परत एकदा जमिनीला पाणी द्यावे व जमिनीमध्ये पंधरा ते वीस दिवस काहीच करू नये.

कोणकोणत्या पिकला हे तन नाशक चालते
हे तन नाशक ऊस, मका आणि दुधी भोपळा या तीन पिकांमध्ये चालते. याशिवाय दुसऱ्या पिकांमध्ये जरी आता नाशकाचा उपयोग केला. तरीही त्या पिकाला खूप घातक ठरेल.

त्यामुळे या तन नाशकाची फवारणी करताना खबरदारी घ्यावी. तसेच याची खरेदी करताना दुकानदाराकडून सुद्धा याची पुरेशी माहिती घ्यावी.
ऊस व मका या दोन्ही पिकांमध्ये या तन नाशकाची प्रति एकर 36 ग्रॅमची फवारणी करावी. वरील प्रमाणे याची काळजीपूर्वक फवारणी केल्यानंतर आपल्या शेतातील लव्हाळे पूर्णपणे नाईनाट होईल

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम