कृषीसेवक | १६ नोव्हेबर २०२३
देशभरतील अनेक शेतकरी शेतीच्या माध्यमातून परिवार चालवीत असतात, पण अनेक शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते, यात विशेष म्हणजे शेती करत असताना शेतकऱ्यांचे अपघात देखील होत असतात. वीज पडणे, पूर, सर्पदंश यांसारख्या अपघातांमुळे शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. तर काहींना कायमचे अपंगत्व येते. यामुळे शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त होतात. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेता सरकारने एक योजना राबवली आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असे तिचे नाव आहे. सुरुवातीला या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणं, अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणं या समस्या समोर आल्या होत्या. परंतु, सरकारने त्यावर उपाय शोधून काढला. अनेकजण या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारच्या या योजनेचा फायदा होत आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
काय आहेत पात्रता
ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल.
ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन नाही परंतु ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याही 1 सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जदाराचे वय 10 ते 75 वर्ष असावे.
शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूच्या १ महिन्याच्या आत त्याबाबतचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्याकडे करावा लागेल. एका साध्या कागदावर अपघाताविषयीची सविस्तर माहिती लिहून देखील अर्ज करू शकता.
मृत्यूचा दाखला
शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार वारसाची नोंद
सातबारा उतारा
आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र
वारसदाराचे आधार कार्ड आणि बँक पासबूक
मृत्यूचा प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटलाचा अहवाल
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम