दुसऱ्या यादीत होणार अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर ; मंत्री अनिल पाटील !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १६ नोव्हेबर २०२३

राज्यातील शिंदे – फडणवीस व पवार सरकारने यंदा ४० तालुक्यात अत्यल्प झालेल्या पावसामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागांच्या झालेल्या पंचनाम्यावरून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता दुष्काळी जिल्ह्यांच्या दुसऱ्या यादीसाठी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

paid add

राज्यातील अजित पवार गटाचे नेते व नंदुरबारच्या पालकमंत्री अनिल पाटील हे नंदुरबार दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील दुष्काळी तालुक्यांची दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यासाठी लवकरच बैठक होणार असून सरकार गतिमान पद्धतीने निर्णय घेत दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना जास्त जास्त मदत देण्याचा प्रयत्न करत असून मागील सरकारच्या काळापेक्षा या सरकारच्या काळात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळत आहे.

विमा कंपन्यांकडून आग्रीम रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यास सुरुवात झाली असून दुष्काळी भागातील उपाययोजना सुरुवात झालेली आहे सरकारने अगोदर घोषित केलेल्या दुष्काळी तालुक्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळी परिस्थितीत दिल्या जाणाऱ्या सर्व मदती सरकारकडून दिल्या जाणारा असून सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबंध असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम