कृषीसेवक | २४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील अनेक शेतकरी मिरची उत्पादन म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा म्हणजे नंदुरबार होय. यावर्षी जिल्ह्यात सहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. हिरव्या मिरचीचा हंगाम सुरू झाला असून मिरचीचे दर 20 रुपयांनी कमी झाल्याने जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून उत्पादन खर्चही निघणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
नंदुरबार जिल्हा हिरव्या आणि लाल मिरचीच्या उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध असून मागील वर्षी मिरचीला चांगले दर मिळाल्याने यावर्षी मिरचीच्या क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र हिरव्या मिरचीचा हंगाम सुरू झाला असून हिरव्या मिरचीला मिळणारा दर कमी असल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. व्यापारी मनमानी पद्धतीने मिरचीचे दर कमी करत असल्याचा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे उत्पादन खर्चही वाढला आहे मिरचीला 15 ते 20 रुपये प्रति किलोचा भाव मिळत असून हा भाव अत्यंत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंधरा दिवसापूर्वी मिरचीला 35 ते 40 रुपयांपर्यंतचा दर मिळत होता मात्र आता अचानक दर कमी झाल्याने तोडणीच्याही खर्च निघत नसल्याचा शेतकऱ्यांनी सांगितले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम