कृषीसेवक | २४ सप्टेंबर २०२३
भारत देश जगाच्या मार्केटमध्ये अव्वल असून देशामध्ये महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा दबदबा आहे. हळद उद्योगातील भविष्याच्या संधींचा वेध घेण्यासाठी शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक निर्यातदार यांच्यासोबत महत्त्वाची जागतिक हळद परिषद येत्या बुधवारी मुंबईत पार पडणार आहे.
मुंबईमध्ये पहिली जागतिक हळद परिषद २७ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडणार असून या परिषदेमध्ये प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपन्या, व्यापारी, प्रक्रिया करणारे, निर्यातदार, संशोधक आणि हळद पिकाशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हळद परिषदेचे उद्घाटन होणार असून हळद मूल्य साखळीतील एफपीओ, व्यापारी, प्रोसेसर आणि निर्यातदार उपस्थित असतील.यावेळी खासदार हेमंत पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. एनसीडीईएक्स समूहाच्या एनआयसीआरद्वारे ही परिषद आयोजित केली जात आहे. हळद उद्योगाच्या उत्पादन, मार्केटिंग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यासारख्या विविध पैलूंवर मंथन करणारी ही परिषद पार पडणार आहे आहे. हळद लागवडीतील नवीन पद्धती त्याचबरोबर हळद निर्यात उद्योगाचा आढावा देखील या परिषदेत घेतला जाणार आहे.
“हळद उद्योगाची ही दीर्घकाळापासून प्रलंबित मागणी होती की एक सर्वसमावेशक व्यासपीठ असावे जेथे सर्व भागधारकांना पीक आणि औद्योगिक वस्तू म्हणून हळदीशी संबंधित सर्व मुद्द्यांवर भेटण्याची आणि चर्चा करण्याची संधी असेल. आम्ही याबद्दल खूप आशावादी आहोत. हा उपक्रम आणि नजीकच्या भविष्यात या उद्योगावर कार्य करण्यासाठी मौल्यवान संधी प्राप्त होईल असा विश्वास आहे,” अरुण रास्ते, संचालक, NICR म्हणाले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम