शेतकरी चिंतेत : दुपारी विजांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २६ नोव्हेबर २०२३

खान्देशातील अनेक जिल्ह्यात सकाळपासूनच आज ढगाळ वातावरण असून या दरम्यान आज दुपारच्या वेळी विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांना फायदा जोवर असला तरी शेतात असलेल्या कापूस व भट पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

हवामान विभागातर्फे राज्यातील काही भागात तीन दिवस अवकाळी पासवाची शक्यता वर्तविण्यात आली होती. वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहण्यास मिळाले होते. दरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विविध ठिकाणी दुपारची एक ते दीड वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. शिवाय सकाळपासूनच हवेत देखील गर्व निर्माण झाला आहे.

अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, काढणीला आलेल्या कापूस पिकाचे, त्याचबरोबर काढनीला आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे, अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम