कृषीसेवक | २६ नोव्हेबर २०२३
देशातील अनेक राज्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने सर्वत्र टंचाईचा सामना करावा लागत असून सध्या यात मराठवाड्यामध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे सध्या शेतकरी पशुपालक देखील मोठ्या चिंतेत सापडले आहेत. पशुधन कसे जगवावे ही चिंता त्यांना सतावत असून चाऱ्याअभावी जनावरे निम्म्या किंमत मध्ये विकायची वेळ आली आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत आहे. पाण्याअभावी चारा मिळेनासा झाला आहे, जो काही चारा आहे, तो महाग असल्याने जनावरांना खाऊ घालणे पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यामुळे आता चार खरेदी करून जनावरांचे पालन करावे आपला घरखर्च भागवावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम