कृषीसेवक | ४ नोव्हेबर २०२३
राज्यातील सरकार नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेत असते. यात अजून एक भर पडली आहे. राज्यातील रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना १ रुपयात विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करता येईल. खरीप हंगामात १ रुपयात विमा योजनेचा शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे रब्बी हंगामातही ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी घेऊ शकतात. शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे. रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत, तर गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्चपर्यंत सहभागी होता येईल. पुणे, हिंगोली, अकोला, धुळे व धाराशिव जिल्ह्यासाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येणार आहे. सातारा, नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम