खान्देशातील शेतकरी चांगलाच वैतागला !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २ सप्टेंबर २०२३ | गेल्या महिन्याभरापासून पावसाने राज्यातील अनेक भागात दडी मारल्याने शेतकरी चांगलेच संतापले आहे. शेतकऱ्यांची पीक वाचवण्यासाठी मोठी धावपळ होत आहे. तर दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने विहीर आणि बोरवेलवरून पाण्याची सोय करून शेती पीक जगवत आहे. मात्र अपूर्ण होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध असलेले पाणीही पिकांना देता येत नाही आहे.

ग्रामीण भागात शेतीसाठी अवघा आठ तास विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीकडून केला जात असतो. त्यातही वीज रेगुलर मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सर्वोच्च ग्रामीण भागात अवघा दोन ते चार तास विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीकडून केला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने एकीकडे पिकांना धोका वाढला आहे. तिथल्या लोकांना उकाडा असह्य होत असून, त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. तळपत्या उन्हामुळे शेतातील पाणी जिरले असून वेळीच पाऊस न पडल्यास मात्र पिके हातून जाण्याची स्थिती आहे. मागील दहा-बारा दिवसांपूर्वी बरसलेल्या पावसामुळे धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळाले यात शंका नाही. मात्र, एकदा पावसाने दडी मारली व तीच परिस्थिती निर्माण होत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्याचं तापमान ३४ अंशावर आले आहे. परिणामी, शेतातील पाणी आटले असून, पिकांना पाण्याची गरज आहे. आता पाणी मिळाले नाही, तर उन्हामुळे पिके सुकणार, अशी स्थिती तयार होत आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाच्या दरवाजातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल करण्यात येत आहे. सध्या निरा देवघर धरणं 100 टक्के भरले आहे. 12.91 TMC इतकी धरणाची पाणी साठवण क्षमता आहे.

पुण्यातील मावळच्या वडगावमध्ये कृषी विभागामार्फत एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. केंद्र शासनामार्फत मिळणाऱ्या विविध योजनांवर कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सामूहिक शेती सुविधा कशी निर्माण करावी. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन कृषी विभागाकडून पायाभूत सुविधा उभारणे, यासाठी शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज देऊन त्यावर अनुदान कशे मिळते, तसेच शेतकरी, स्वयंसहाय्यता गट, प्राथमिक कृषि पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, कृषि उद्योजक, कृषि उत्पन्न बाजार समिती, कृषि स्टार्टअप इ. योजनेअंतर्गत शेतकरी भाग घेऊ शकतात. सामूहिक शेती सुविधा, ड्रोन खरेदी, शेतावर विशेष सेन्सर्स लावणे, रिमोट सेनसिंग, अशा अनेक योजनाना बॅंक कर्जावर तीन टक्के व्याज सवलत देण्यात येणार आहे. याची सर्व माहिती शेतकऱ्यांना कृषी विभागा मार्फत घेतलेल्या एक दिवसीय शिबिरात देण्यात आली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम