देशात यंदा तांदळाचे उत्पादन 5 टक्क्यांनी घट !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १ सप्टेंबर २०२३

देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. तर काही राज्यांमध्ये अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. कमी पावसाचा परिणाम शेती पिकांवर झालेला आहे. यावर्षी तांदळाच्या उत्पादनात 5 टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा कमी पावसामुळे शेती पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. खरीप हंगामात वेळेवर पाऊस न झाल्याने काही पिकांची पेरच झालेली नाही. ज्या पिकांची पेर झाली त्याला पुरेसा पाऊस न मिळाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाचा भात लावगवडीवर मोठा परिणाम झाला असून, देशाचे प्रमुख पीक असलेल्या तांदळाचे उत्पादन यंदा 5 टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तांदूळ उत्पादनात आघाडीवर असलेल्या पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे वेळेत भाताची लागण झालेली नाही. परिणामी भात पिकाची वाढ म्हणावी अशी झालेली नाही. त्यामुळे या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे तांदूळ उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे भात पिकांच्या पेरणी आणि वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे तांदूळ उत्पादनाबाबत चिंता निर्माण झाली आहे. याव्यतिरिक्त, एल निनो आणि प्रतिकूल हवामानामुळे देशाच्या जेडीपी वाढीच्या अनुशंगाने FY24 मध्ये जागतिक तांदूळ उत्पादनात अंदाजे 7 दशलक्ष टन तूट झाल्यामुळे जागतिक तांदळाच्या किंमती वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

देशात खरीप (उन्हाळी-पेरणी) आणि रब्बी (हिवाळी-पेरणी) या दोन्ही हंगामात भात पीक घेतले जाते. यंदा सरकारने चालू खरीप हंगामात 521.27 लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी खरीप हंगामात 496 लाख टन तांदूळ खरेदी करण्यात आली होती.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम