कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरून निघण्याची अपेक्षा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ | गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याच्या घसरलेल्या दराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.त्यात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने नुकसान भरपाई निघण्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

सातारा,जळगाव ,, पुणे ,औरंगाबाद ,आणि नागपूर , जिल्ह्यात कांद्याने सरासरी १५ ते १७ रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचा खर्च वसूल झालेलानसून राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती. बाजारात चांगला दर मिळाल्यावर विक्री करू, असे शेतकऱ्यांना वाटले.मुसळधार पावसामुळे साठवलेला कांदा पाण्यात वाहून गेलयाने नुकसानीचा सामना करावा लागला .

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम