आले उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २८ ऑक्टोबर २०२२ | राज्यातील आले उत्पादकांना मागील काही वर्षांपासून मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीकआतबट्ट्याचं ठरत आहे.शेतकरी आले उत्पादनासाठी लाखो रुपये खर्च करतात. मात्र आले उत्पादकांना पुरेसा खर्च निघत नाही .

राज्यात आले पिकाखाली सुमारे २० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र विस्तारले होते. सातारा, औरंगाबाद, सांगली, पुणे, बीड आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये आले पिकांची लागवड विशेष वाढली. चार वर्षांपुर्वी आले पिकातून किमान सरासरी तरी होत होती, असे शेतकरी सांगतात. ऑक्टोबर महिन्यात पहिल्या २० दिवसांमध्ये आलं उत्पादक भागात जोरदार पाऊस पडला. परिमाणी आल्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या आणखी वाढल्या. सध्या बाजारात आल्याची आवक कमीच होत आहे. मात्र आल्याला २ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम