शेतकरी पुन्हा संकटात; सोयाबीन बियाणे किमतीत मोठी वाढ !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ९ एप्रिल २०२४ । यावर्षी म्हणजेच २०२४ मध्ये सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत वाढ झालेली आहे.सध्या खरीप हंगामासाठी बियाणे खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे असून याबरोबरच सोयाबीन बियाण्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. काही खासगी बियाणे कंपन्यांनी मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत. यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक बोझा वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार एका कंपनीने २३ किलो वजनाच्या बॅगची किंमत तब्बल ४१५० रुपये इतकी निश्चित केली आहे. तर दुसर्‍या कंपनीचे २५ किलो बॅग ३४५० रूपयांना विकली जात आहे. गेल्या हंगामात प्रचंड मागणी असलेल्या सोयाबीन उत्पादक एका कंपनीच्या वाणाची किंमत यंदा किलोला २०० रुपये इतकी आहे.

पारंपरिक ३३५ आणि ९३०५ या वाणांना मागणी कमी असल्याने त्यांच्या दरात वाढ झाली नाही. मात्र इतर बियाण्यांच्या दरात ३०० ते ६०० रूपयांपर्यंत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. बियाणे कंपन्यांची मार्केटिंग काही बियाणे कंपन्या गावोगावी थेट प्रतिनिधी पाठवून बुकिंग आणि पुरवठा करत आहेत.

paid add

सदर व्यवहारात शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नाही. राउंडअप बीटी नावाच्या तणनाशकाला प्रतिरोधक असलेल्या सोयाबीन बियाण्यांचा जातीचा मोठा धंदा सुरू आहे. विशेष म्हणजे या मार्केटिंगवर गुणवत्ता नियंत्रण विभागाचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची बियाणे खरेदीत फसवणूक होऊ शकते.

शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. व बिलाची आणि पावतीची मागणी करावी. सरकारी बियाणे संस्थांकडून उपलब्ध असलेल्या बियाण्यांचा विचार करावा. कृषी विभागाकडून बियाण्यांच्या दराबाबत माहिती नक्कीच घ्यावी. या वाढत्या दरांमुळे शेतकर्‍यांवर आर्थिक बोझा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणे खरेदी करताना काळजी घेणे अगदी गरजेचे आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम