शेतकऱ्यांना मिळणार आता 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १५ डिसेंबर २०२२ I यांत्रिकीकरण हा एक कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग झाला असून यांत्रिकीकरणाचे महत्त्व हे शेती क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना फायदा होईल अशी एक योजना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवली जात असून योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जाणार असून या ट्रॅक्टर साठी लागणाऱ्या इतर उपकरणांवरदेखील अनुदान देय आहे.

तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी यासाठी 23 डिसेंबर ही शेवटची तारीख असून या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आव्हान सोलापूर जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले असून या योजनेच्या बचत गटांचे उत्पन्न वाढवता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम