राज्यातील तापमानात चढ उतार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १८ डिसेंबर २०२२ I बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वादळी प्रणालींमुळे राज्यात झालेले पावसाळी वातावरण निवळत आहे. दोन दिवसांपासून उन्हाचा चटका आणि वाढलेला उकाडा कायम आहे. परिणामी, राज्यातून थंडी ओसरली आहे.

 

आज (ता. १८) कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.आज (ता. १८) पूर्व विदर्भात पारा घसरण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात वाढलेले तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. १७) गडचिरोली येथे राज्यातील नीचांकी १५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २५ अंशांच्या दरम्यान होते. सांताक्रूझमध्ये देशातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम