जिरेनियमची शेती ठरेल फायदेशीर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २४ डिसेंबर २०२२ Iआपण एक अशी शेती जी शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरेल, याविषयी थोडक्यात माहिती पहाणार आहोत.ती म्हणजे जिरेनियम.ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे.याची अधिक माहिती ही सरकारच्या सुगंधी औषधी विभागात मिळते.या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते.एका एकरमध्ये 10,000 हजार रोप लागतात.आणी हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो.इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75

खर्च कमी आहे.या पिकामध्ये आंतरपिक म्हणुन शेवगा हे पिक उत्तम असते.या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो.या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते,व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते.एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळते.एक लिटर ऑईलची किंमत जाग्यावर 12500 हजार रु मिळते. एक एकर मध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाच ऑईल मिळते. एकरी उत्पादन सरासरी चार ते पाच लाख.या वनस्पतीची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.हायडेनसिपरफ्यूम व कॉस्मेटिक साठी याचा वापर केला जातो.

 

फरफ्युम मध्ये जी नॅचरिलीटी लागते ती या मधूनच मिळते.म्हणुन जिरेनियम शिवाय पर्याय नाही.या वनस्पतीची भारताची रिकवॉयरमेंट दर वर्षाला 200 ते 300 टनाची आहे.पण सध्यस्थिती पहाता भारतात वर्षाला दहा टन पण ऑईल निर्मिती होत नाही. त्यामुळ या आणी अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करण अधिक फायदेशीर ठरेल. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमिच आहे.हे पिक फायदयाचे आहे,यात कुठला घाटा किंवा फसवेगीरी नाही,अस खुद शेतक-यांचे म्हणने आहे.आणी हे पिक इनस्टंट अर्निंग देणार पिक आहे अस ही म्हणने आहे.यात सरकार आणि कृषी विभागानी लक्ष घातल तर नक्किच शेतकऱ्यांचा फायदा होईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम