बटाटा लागवडीतून मिळवा चांगला नफा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ | बटाटा पिकाचे उत्पादन खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामामध्ये जास्त येत असल्याचे संशोधनांमधून सिद्ध झालेले आहे. जमिनीचे तापमान १७ ते २० अंश सेल्शिअस दरम्यान असल्यास; तसेच जमिनीमध्ये योग्य ओलावा व पोषक अन्नघटक असल्यास बटाटे चांगले पोसतात. मध्यम प्रतीची, मिश्रित पोयट्याची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकासाठी जास्त चांगली असते. पाणथळ, भारी किंवा चिकण जमिनीमध्ये लागवड केल्यास बियाणे-बटाट्याच्या फोडी लागवडीनंतर लगेच सडत-कुजत असल्याने अश्या जमिनींची लागवडीसाठी निवड करू नये.
लागवडीसाठी फक्त प्रमाणित, सत्यप्रत व निरोगी-कीड व रोगमुक्त बियाणे वापरावे. काह्रीप हंगामातील लगेच ताब्बी हंगामातील लागवडीसाठी वापरू नये. बियाणे हे २५ ते ३० ग्राम वजनाचे, ५ सेंमी व्यासाचे, साधारणत: अंड्याच्या आकाराचे, पूर्ण वाढलेले व त्यवर अंकुर फुटलेले, ठेंगणे, जाड व त्यावर चांगले पोसलेले कोंब असावेत. एकरी ६-८ क्विंटल बियाणे पुसेशे असते. बियाण्याचे बटाटे कापून फोडी करण्यासाठी ० २. टक्के मॅन्कोझेबच्या द्रावणात बुडवून जंतूविरहित केलेले विळा-विळी किवा चाकू वापरावेत. लागवडीअगोदर कापलेल्या फोडी कमीत कमी १० ते १२ तास सावलीत सुकवून घ्याव्यात. कुफरी लवकर, कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, कुफरी जवाहर (जे. एच. २२२), पुखराज, कुफरी बादशाह, कुफरी कुबेर, अलंकार, कुफरी चमत्कार या जाती लागवडीस योग्य आहेत.
बटाटा लागवडीसाठी खरिपातील पिकांची काढणी होताच जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून एकरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. सरी-वरंबे तयार करून ४५ बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करावी. माती परीक्षणानुसार लागवडीपूर्वी एकरी ४० किलो नत्र, २५ किलो स्फुरद, ५० किलो पालाशची मात्रा द्यावी. उर्वरित २० किलो नत्राची मात्रा लागवडीनंतर एक महिन्याने देवून मातीची भर द्यावी. दुसऱ्यांदा मातीची भर ५५-६० दिवसात द्यावी. जमिनीचा मगदुर व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार बटाट्यास थोडे-थोडे आणि कमी अंतराने पाणी देणे फायद्याचे ठरते. बटाट्यावर येणाऱ्या मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी आळी या रसशोषणाच्या किडींचा तर मर, करपा, तांबेरा या रोगांचा तज्ञांच्या सहाय्याने योग्य वेळी नियंत्रण करावे. सोयाबीन, मूग, उडीद किंवा बाजरी या पिकानंतर बटाट्याचे पीक घेतल्यास उत्पादन चांगले मिळते, जमिनीचा पोत टिकून राहतो. रब्बी हंगामामध्ये डिसेंबर व जानेवारीमधील वाढत्या थंडीमुळे बटाटे चांगले पोसून अधिक उत्पादन मिळत असल्याने १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान बटाटे लागवड करावी. त्यानंतर लागवड केल्यास पीकवाढीच्या काळात तापमान वाढल्याने उत्पादनावर विपरीत परिमाण होतो. उसात बटाटा आंतर पीक चांगला नफा देते

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम