मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे संपूर्ण मराठवाड्यामध्ये १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत मंगळवारी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मराठवाड्यातील ५० पेक्षा जास्‍त गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

त्यासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांची २५ पथके स्थापन करण्‍यात आली आहेत. त्यात १०० पेक्षा शास्‍त्रज्ञांचा समावेश आहे. संपूर्ण दिवसात विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ शेतावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्‍यांच्‍या कृषी विषयक समस्‍या जाणून घेणार आहेत.विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमांतर्गत कुलगुरू डॉ.इंद्र मणी मंगरूळ (ता.मानवत) येथे शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन संवाद साधणार आहेत.‘

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषी विज्ञान केंद्रे,संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदी ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि प्राध्‍यापक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्‍या जाणून घेणार आहेत. विविध शेती विषयक विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम