कृषी सेवक I १८ डिसेंबर २०२२ I
राज्यात अलीकडच्या काळात सीताफळाच्या झाडाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सीताफळाची पिकलेली फळे अत्यंत गोड मधुर आणि चविष्ट असतात या गुणधर्मामुळे त्यांचा वापर मिल्कशेक ,आईस्क्रीम अशा पदार्थांमध्ये आज वाढत आहे आजकाल मोठे समारंभ किंवा लग्नकार्य अशा ठिकाणी हॉटेलमध्ये सीताफळापासून बनवलेले प्रक्रिया पदार्थ यांची मागणी जास्त आहे. त्याचे कारणही आहे सिताफळा मध्ये शर्करा, जीवनसत्वे क्षार ,फायबर व प्रथिने असतात त्यापासून शरीराला चांगली उर्जा मिळते आणि त्यांना गोड स्वाद सुद्धा आहे. तसेच सीता फळांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे क्षार सुद्धा उपलब्ध आहेत. हे वात आणि पित्तनाशक असून अतिसार वर फार गुणकारी आहे. बरेच शेतकरी सीताफळ लागवड माहिती द्या असे म्हणतात,वाचा सीताफळाची लागवडीविषयी …
सिताफळाच्या पानात ॲकोरीन आणी ॲनोनीन ही गुणकारी कीटकनाशके सुद्धा असतात. या झाडांमध्ये हायड्रोसायनिक आम्ल असल्यामुळे सीताफळाच्या झाडाला वाळवी कधीच लागत नाही. आणि सीताफळाच्या झाडाचे सर्वात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे शेळी ,मेंढी किंवा इतर कोणतेही प्राणी ते या झाडाची पाने खात नसल्यामुळे संरक्षण न करता या फळझाडाची जोपासना करणे अतिशय सोयीचे व सोपे आहे. हे फळ अत्यंत काटक, हलक्याव मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे आहे तसेच दुष्काळातही तग धरून टिकून राहते वातावरणातील बदल पाहता दिवसेंदिवस पर्जन्यमानात कमी जास्त बदल होत आहे परंतु या पर्जन्यमानाचा व वातावरणाचा सिताफळावर कुठलाही परिणाम होत नाही.
सीताफळ या फळाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र ,कर्नाटक ,राजस्थान, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश ,उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये प्रमुख्याने करताना आपल्याला आजही दिसते. तसेच महाराष्ट्रात बीड ,अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, नाशिक ,सोलापूर ,पुणे ,औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रामुख्याने लागवड आढळून येते मराठवाड्यातील धारूर ,दौलताबाद तसेच आंध्र प्रदेशातील बालाघाट आणि पुणे जिल्ह्यातील सासवड ही गावे सीताफळासाठी खूप प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात सीताफळाच्या लागवडीमध्ये वाढ झाली असून याचे मुख्य कारण म्हणजे या फळ पिकासाठी अनुकूल हवामान महाराष्ट्रात असून महाराष्ट्र शासनाने या फळपिकांचा समावेश आता राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमातही केला आहे.
* सिताफळा साठी लागणारे हवामान –
सीताफळासाठी हवामान लक्षात घेता कोरडे व उष्ण हवामान सिताफळास मानवते. कुठल्याही परिस्थितीत तग धरून जिवंत राहणे हे या फळझाडाचे वैशिष्ट्य आहे. सीताफळास जास्त पाण्याची गरज असते आणि फळे येताना उबदार व कोरडे हवामान असल्यास फळांमध्ये गोडी चांगली येते मात्र दमट हवामानात वाढ चांगली होते कमी पावसाच्या प्रदेशात डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात झाडांची पानगळ होऊन झाले विश्रांती घेतात वसंत ऋतु सुरू झाल्यावर फूट ठेवून फुले येतात मात्र उन्हाळ्यात तापमान जास्त व हवा कोरडी असते यामुळे फळधारणा होत नाही फुले गळून पडतात पावसाळा सुरू झाल्यावर मात्र फुले येतात व नंतर चांगली फळधारणा फळेसुद्धा लागतात.
सीताफळाच्या लागवडीसाठी आवश्यक असणारी जमीन –
सीताफळ या पिकासाठी हलकी ते मध्यम सांगली निचरा होणारी दोन ते तीन टक्के उताराची सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन असावी लागते. काळी भारी पाणी साचून राहणारी अगर चोपण जमिनीत लागवड करू नये तसेच एक फुटाच्या खोलीवर खडक लागल्यास लागवड थांबवावी.
सीताफळाच्या वेगवेगळ्या जाती –
धारूर – 6 –
मराठवाडा कृषी विद्यापीठाने मराठवाडा विभागाच्या लागवडीसाठी प्रसारित केलेली ही एक प्रमुख जात या जातीची फळे आकाराने मोठी असून गराचे प्रमाण यामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात असते तसेच विद्राव्य घटकांचे प्रमाणही खूप जास्त आहे. इतर जातींच्या तुलनेने फळांची गोडी अधिक असून साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.
टि.पी. -7 –
सीताफळाची ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने ही जात सन 2000 मध्ये शिफारशीत केली असून फळाचे वजन 400 ते 500 ग्राम आहे यातील विद्राव्य घटकांचे प्रमाण 48 टक्के असून गराचे प्रमाण 55 टक्के आहे या जातीची फळे हिरव्या रंगाची असून याचे प्रमाण खूप कमी आहे प्रत्येक धोक झाडापासून 70 ते 100 फळे उत्पादन अपेक्षित आहे.
बाळानगर –
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली व आंध्र प्रदेशात विकसित केलेली ही जात या जातीच्या फळाचे सरासरी वजन 266 ग्राम असून गराचे प्रमाण 48 टक्के प्रत्येक झाडापासून 50 ते 60 पाढे मिळणे अपेक्षित आहे फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण आणि 27 टक्के असून बियांचे प्रमाण हे तीन टक्के एवढे आहे.
अर्का सहान –
ही सीताफळाची जात भारतीय बागवानी संस्था बंगलोर येथे विकसित केली गेली आहे या जातीची फळे दिसायला आकर्षक गोलाकार असून फळांचा रंग फिक्कट हिरवा तर डोळे पसरट चपटे असतात. फळाचे वजन 400 ते 500 ग्रॅम असून गराचे प्रमाण 48 टक्के आहे तर विद्राव्य घटक किती टक्के आहेत फळे खाण्यास फारच गोड आहेत या फळांमध्ये बिया ची संख्या फार कमी असून आकाराने लहान असतात फळावरील दोघांमधील अंतर कमी असल्याने पिठ्या ढेकूण या किडीचे प्रमाण कमी आढळते इतर जातींपेक्षा या जातीची फळे अधिक काळ टिकतात.
फुले पुरंदर –
पुणे पुरंदर ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सन 2014 मध्येच महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केली होती या जातीची फळे आकर्षक आणि आकाराने मोठी असून फळाचे वजन हे 360 ते 388 ग्राम असून गराचे प्रमाण हे 45 48 टक्के आहे. प्रत्येक झाडापासून 118 ते 154 फळाचे उत्पादन मिळते फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण 22 ते 24 टक्केव घट्ट रसाळ आणि आल्हाददायक असतो घरातील पाकळ्या पांढऱ्याशुभ्र असून त्यांची संख्याही जास्त आहे फळात बियांची संख्या अतिशय कमी असून जातीच्या फळांचा गरा पासून तयार केलेल्या रबडीला जास्त मागणी आहे.
सीताफळाच्या झाडांची लागवड –
सिताफळ सिताफळाची लागवड करताना पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये कलमे अगर रोपे लावावीत रोपे लावताना मध्य भागी लहान खड्डा करून लावावी तसेच माती हाताने दाबून काठीचा आधार देउन बांधावी व पाऊस नसेल तर लगेच झारीने पाणी द्यावे. सीताफळ लागवड अंतर व्सियवस्ताथित ठेवावे लागते. फळाचे लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवून उन्हामध्ये तापवुन घ्यावे नंतर पावसाळ्यापूर्वी हलक्या व मुरमाड जमिनीत 4 बाय 4 मीटर व मध्यम जमिनीत पाच बाय पाच मीटर अंतरावर 45 बाय 45 आकारमानाचे खड्डे घ्यावेत प्रत्येक खड्ड्यात एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्राम दोन टक्के मिथिल पॅराथिऑन पावडर यांचे मिश्रण टाकावे सोबत शेणखत टाकावे त्याच्या वापरामुळे सिताफळाच्या वाढीस मदत होते.
सिताफळ लागवडी नंतर घ्यावयाची काळजी –
शेतकऱ्यांनी सीताफळाच्या लागवडीनंतर झाडाच्या सभोवतालची तण काढणे पाण्यातील माती काढणी करून खाली वर करणे म्हणजे झाडाभोवती जमिनीतील पाणी व हवा यांचे संतुलन राहून अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पाऊस संपताच गव्हाचे जुने काढ, पडवळाचे तुकडे ,उसाचे पाचट, भाताचे तूस, भाताचा पेंढा ,वाढलेले गवत ,लाकडाचा भुसा यापैकी आच्छादन टाकून पावसाळ्याचे जमिनीत मुरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन थांबवावे आच्छादन करण्यापूर्वी जमिनीवर मिथिल पॅराथिऑन पावडर टाकावी. जेणेकरून झाडाला सेंद्रिय खताचा पूर्ण पुरवठा होऊन जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढेल आणि झाडाची वाढ झपाट्याने होऊन झाडाची कार्यक्षमताही वाढेल .
सीताफळाच्या झाडाला योग्य वळण देणे –
सीताफळाच्या झाडाला योग्य आकार देण्यासाठी फांद्या जमिनीला टेकणार नाहीत त्यासाठी मुख्य खोडावर येणारे फुटवे जमिनीपासून एक मीटर अंतरावर या आडव्या फांद्या येथील त्या फांद्या काढून टाकाव्यात काढून टाकाव्यात. अशा प्रकारे झाडांना वळण दिल्यास बागेत झाडावर भरपूर सूर्यप्रकाश पडत राहील त्यामुळे झाडांची वाढ फुले लागण्याचे प्रमाण वाढून साधारणता फळधारणा चांगली होऊन योग्य प्रतीचे उत्पादन मिळते व फळांची तोडणी करणे अतिशय सोपे जाते. अनेक शेतकऱ्यांची अशी सीताफळ लागवड यशोगाथा आहे.
सीताफळाची शाखीय पद्धतीने अभिवृद्धी आणि आंतरपिके –
सिताफळाची अभिवृद्धी केल्यास फळे एकाच गुणधर्माची चांगली गुणवत्ता असणारी व मोठी फळे मिळतात. उत्पादन सारखेच असते त्यामुळे बिया पेक्षा कलम पद्धतीने लागवड करणे फायद्याचे ठरते. सिताफळ लागवडी नंतर शेतामधे काही आंतर पिके ही शेतकरी घेऊ शकतात सिताफळ लागवडी नंतर दोन-तीन वर्षे खरीप हंगामात पुढील प्रकारची पिके घेता येतील तूर, चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा ताग अशा प्रकारचे पिके उर्वरित जागेत घेता येतात आणि शेतकरी सिताफळाची झाडे मोठे होईपर्यंत इतर पीक काढून आपली उत्पादन क्षमता वाढवू शकतात.
सीताफळ लागवडS itafal Lagwad Mahiti in Marathi अनुदान सरकार कडून मिळते. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी जरूर घ्यावा.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम