शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता मिळणार पाइपलाइनसाठी अनुदान

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १३ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतात लागणाऱ्या वस्तूसाठी नेहमीच कर्ज काढून शेती करीत असतो पण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमधील पाइपलाइनचा विचारत करत पाइपलाइनसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र हा अर्ज कुठे आणि कसा करायचा, तसेच या योजनेनेसाठी किती अनुदान मिळणार आहे.

paid add

केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी वेगवेळ्या योजना सुरु करत असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप मदत देखील होते. अनेक योजनेनमुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारे अनुदान दिले जाते. मात्र आता शेतकऱ्यांसाठी सरकारकडून पाईपलाईनसाठी अनुदान दिल जाणार आहे.

शासन या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75 टक्के पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना 50 टक्के आणि 15 हजारांपर्यंत रोख मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत, सरकार HDF आणि TVC पाइपलाइनसाठी सबसिडी देईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरायची आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसांनी सरकारकडून महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर करण्यात येते. त्या जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये अर्ज केलेल्या व्यक्तीचे नाव असेल तर या योजनेचा लाभ त्याला मिळणार आहे. त्यानंतर त्यात काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम