कृषीसेवक | १३ नोव्हेबर २०२३
देशभरातील अनेक शेतकऱ्यांना नेहमीच अर्थ सहाय्य करण्यासाठी केंद्रासह राज्य सरकार नेहमीच विविध योजनेच्या माध्यमातून अनेक योजना राबवीत असतात. यासोबतच शेतकऱ्यांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून किसान विकास पत्र योजना चालवते. शेतकऱ्यांना गुंतवलेली रक्कम काही महिन्यांत दुप्पट करायची असेल, तर या बचत योजनेत गुंतवणूक करणे हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो.
खरं तर, KVP योजनेत गुंतवलेली रक्कम अंदाजे 9.5 वर्षांच्या म्हणजे 115 महिन्यांच्या कालावधीत दुप्पट होते. यामुळेच ज्या लोकांना गुंतवणुकीची रक्कम कमी वेळात दुप्पट करायची आहे, त्यांनी या योजनेत पैसे गुंतवणे फायद्याचे ठरते.
दुसरी खास गोष्ट म्हणजे KVP स्कीम ही पोस्ट ऑफिस स्कीम आहे, त्यामुळे पैसे गमावण्याचा धोका नाही. केंद्र सरकारच्या किसान विकास पत्र योजनेच्या (KVP योजना) नवीनतम अपडेटनुसार, तिचा कार्यकाळ आता 115 महिने म्हणजे 9 वर्षे आणि 5 महिने आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम रु 1,000 आहे, तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. म्हणजेच या योजनेत तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकतात. पैसे दुप्पट होण्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही आज एकरकमी रक्कम गुंतवली तर तुम्हाला 115 व्या महिन्याच्या शेवटी दुप्पट रक्कम मिळू शकते. अशा परिस्थितीत ही योजना शेतकऱ्यांना दीर्घकालीन बचत करण्याची संधी देते.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम