शेतकरीना सरकार देणार या वाहनासाठी ५० टक्के अनुदान !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २९ जानेवारी २०२३ ।  सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात जरी शेती करीत असला तरी तो अत्याधुनिक सुविधेपासून आजही वंचित आहे. तर काही शेतकरी अत्याधुनिक सोई सुविधेचा वापर करीत शेतीतून चांगले उत्पन्न मिळवीत असतोय. पूर्वी शेतात नांगरणी करीता बैलजोडीचा वापर केला जात होता मात्र आता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. हा ट्रॅक्टर आपसूकच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महत्वाची जागा मिळवून बसला आहे. शेतकरी नांगरणी आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात. भारतात असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही. मात्र मोदी सरकारने ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्याची योजना सुरु केली आहे. शेतकरी नांगरणे आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात.

-केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देते.
-यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात आणि तेही निम्म्या किमतीत.
-उर्वरित अर्धे पैसे अनुदान म्हणून सरकारकडून दिले जातात.
-अनेक राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के अनुदान देते.
-देशातील इच्छुक लाभार्थ्यांना ज्यांना या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून नवीन ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50% अनुदान मिळते .
-जर त्यांना या योजनेत अर्ज करायचा असेल तर त्यांनी कृषी विभाग किंवा जवळच्या जन सेवा केंद्रात जावे लागेल.
-जन सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला अर्ज भरावा लागतो.
-अर्जाचा फॉर्म प्राप्त झाल्यानंतर, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता इत्यादी आपल्याला भरावी लागेल
-आणि नंतर तुमची सर्व कागदपत्रे अर्ज अर्जात जोडा आणि ती जन सेवा केंद्रातच सादर करावी लागतील.

1: सर्वात प्रथम शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (https://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावी.
2: अर्थसहाय्याचे स्वरूप – ट्रॅक्टर (२० अश्वशक्ती पर्यंत) साठी इतर लाभार्थाना २५ टक्के व अज/अजा/अल्प/महिला यांना ३५ टक्के अर्थसहाय्य दिले जाईल. 3: ट्रॅक्टर व इतर अवजारे करीता जास्तीत-जास्त दिले जाणारे अनुदान खालीलप्रमाणे आहे –
1 : ट्रॅक्टर – अज/अजा/अल्प/महिला करिता रुपये १०००००/- तसेच इतर लाभार्थी करिता रुपये ७५०००/-
2 : नॅपसॅक/फूट पंप – अज/अजा/अल्प/महिला करिता रुपये ६००/- तसेच इतर लाभार्थी करिता रुपये ५००/- अनुदान देय आहे.
3 : पॉवर नॅपसॅक स्प्रेअर/पॉवर संचालित तैवान स्प्रेअर (क्षमता ८-१० लिटर) – अज/अजा/अल्प/महिला करिता रुपये ३१०००/- तसेच इतर लाभार्थी करीत रुपये २५०००/-.
4 : शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर अवजारे खरेदी करावीत. देय अनुदान जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून PFMS प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम