निर्यात द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता ” ग्रेपनेट” कार्यप्रणाली कार्यान्वित

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ ऑक्टोबर २०२२ | दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी युरोपियन देशांना तसेच इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता निर्यातक्षम द्राक्ष बागांची नव्याने नोंदणी करणे व जुन्या भागांची नोंदणी करण्याकरिता ग्रेपनेट ही कार्यप्रणाली दिनांक 5 ऑक्टोबर 2022 पासूनकार्यान्वित करण्यात आलेली आहे. सन 2021- 22 मध्ये सर्वाधिक 263075 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली त्यापैकी 105827 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात युरोपियन देशांना झाली.

सन 2021 22 हंगामात युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीचा तपशील

देश 1) युरोपियन युनियन – द्राक्ष निर्यात ( मे. टन) 105827 मूल्य कोटीत 1194

इतर देश – द्राक्ष निर्यात ( मे. टन) 157248, मूल्य कोटीत 1104 एकूण 263075 – 2302

युरोपियन देशांनी किडनाशक नियंत्रणाबाबत चे निकष अत्यंत कडक केले असल्याने त्या बाबीची पूर्तता करण्याकरिता तसेच युरोपियन देशांच्या अटी व शर्तीची शर्तीची पूर्ततेची हमी देण्यासाठी सन 2003-04 पासून राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता किडनाशक उर्वरित अंश नियंत्रण कार्यप्रणाली तयार करण्यात आली व त्याची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

सदर कार्यप्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरता ग्रेपनेट ही ऑनलाईन कार्यप्रणाली अपेडा द्वारे विकसित करून सदर कार्यप्रणाली मध्ये सर्व भागीदारी संस्थांना समावेश करून त्याद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी ते फायटोसॅनिटरी प्रमाणीकरणाची ही सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली.

युरोपियन युनियन व इतर देशांना कीडनाशक उर्वरित अंश तसेच युरोप कीड व रोग मुक्त ची हमी देण्यासाठी निर्यातक्षम द्राक्ष बागांची ग्रेप नेट अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे .तसेच नोंदणीकृत द्राक्ष बागेतील द्राक्ष निर्यात करणे निर्यातदारांना ही बंधनकारक करण्यात आले.

निर्यातक्षम द्राक्ष बागांचे नोंदणीची सद्यस्थिती

ग्रेपनेट अंतर्गत सण 2021 -22 मध्ये मध्ये 44180 भागांची नोंदणी करण्यात आली त्यापैकी महाराष्ट्रात 44123 व कर्नाटक मध्ये 57 द्राक्ष बागांची नोंदणी झाली. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात 34295, सांगली 4862 पुणे 1238सोलापूर 641 अहमदनगर 871 सातारा 432 उस्मानाबाद 550 लातूर 128 बुलढाणा 42 व जालना 18 निर्यातक्षम बागांची ग्रेपनेटद्वारे नोंदणी करण्यात आली आहे.
सन 2022-23 मध्ये अपेडा नवी दिल्ली यांनी ट्रेड नोटीस क्रमांक/ Advisory/ 2022 -23 दिनांक 15thMarch,2022 अन्वये युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता निर्यातक्षम द्राक्ष बागांचे ग्रेपनेट द्वारे नोंदणी करण्याकरिता दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ते 31 डिसेंबर,2022 ग्रेपनेट कार्यप्रणाली करिता सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत.

ग्रेटनेट द्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागाची नोंदणी

 निर्यातक्षम द्राक्ष बागाची नवीन नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ते 31 डिसेंबर,2022 या कालावधीत ग्रेपनेटद्वारे सुविधा कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

 निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता प्रपत्र -2 मध्ये अर्ज व अर्जासोबत सातबारा ची प्रत तसेच रुपये 50 फी अर्ज भरून अर्ज संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे करणे

 निर्यातक्षम द्राक्ष बागांची ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता फार्म रजिस्ट्रेशन मोबाईलॲप कार्यान्वीत करण्यात आलेला आहे सदर ॲपद्वारे द्राक्ष बागायतदारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत त्याकरिता शेतकऱ्यांनी सदर मोबाईलॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून अर्ज करता येते. निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता करावयाच्या अर्जामध्ये शेतकऱ्यांनी करावयाच्या अर्जामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव ,पत्ता, मोबाईल नंबर सातबारा क्रमांक ,द्राक्षाची जात, क्षेत्र छाटणीची तारीख तसेच

काढण्याची तारीख व अंदाजे अपेक्षित उत्पन्न त्याच बरोबर बागेस ग्लोबल गॅप प्रमाणपत्र असल्यास त्याचा तपशील इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे.

 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागामार्फत संबंधित निर्यातक्षम द्राक्ष बागांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रपत्र चार मध्ये शिफारस करून निर्यातक्षम द्राक्ष बागांची द्राक्ष बागास ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र प्रोसेस करून संबंधित द्राक्ष बागायतदारांना देण्यात येते.

 निर्यातक्षम द्राक्ष बागांचे नोंदणी केल्यानंतर प्रथम शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर ऑनलाइन द्वारे बागेचे नोंदणी /नूतनीकरण केल्या बाबतचा संदेश पाठविला जातो निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकाकडे संपर्क साधून

नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे  नोंदणी केलेल्या नोंदणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांची सविस्तर तपशील दररोज अपेडाच्या च्या वेबसाईटवर एम आय

एस (MIS)मध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे तसेच डिरेक्टरी मध्ये नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची शेतकरी निहाय व गाव निहाय तसेच नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक व मोबाईल नंबर इत्यादी तपशील दिलेला आहे त्यामध्येही संबंधित शेतकऱ्यांचीआपली माहिती सुविधा उपलब्ध आहे.

निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागायतदारांनी खालील रेकॉर्ड ठेवणे व कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत घ्यावयाची दक्षता

 राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागेवरील कीड रोगाचे नियंत्रण करण्याकरिता प्रपत्र-5 मध्ये निर्धारित केलेल्या लेबल क्‍लेम औषधाची फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच त्याचा रेकॉर्ड प्रपत्र- 2 मध्ये ठेवणे आवश्यक आहे  सन 2021-22 या वर्षाकरिता केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती फरीदाबाद यांनी द्राक्ष पिकावरील किडी व रोगाचे नियंत्रणाकरिता 68 औषधांची लेबल क्‍लेम मंजूर केलेले आहे. त्याची माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे यांनी दिनांक 8 सप्टेंबर 2021-22 अन्वये प्रपत्र -5 मध्ये अंतिम केली असून त्याची माहिती अपेडाच्या वेबसाईटवर ग्रेपनेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये एम आर एल च्या मर्यादा व प्री हार्वेस्ट इंटर्वल कालावधी दिलेला आहे  निर्यातक्षम द्राक्ष बागेतील किडनाशक उर्वरित तपासणीकरिता आपल्याला द्वारे सतरा कीडनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेना परवानगी दिलेली आहे. सदर प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीद्वारे आपल्या बागेचा 4 बी मध्ये तपासणी केल्यानंतरच द्राक्षाचा नमुना तपासून त्याचा अहवाल ऑनलाइन केला जातो व त्याची एक प्रत संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते

 कीडनाशक तपासणीचा अहवाल संबंधित शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून अपेडाच्या साइटवर डाउनलोड अनालिसिस रिपोर्ट ( Download Analysis Report)वर क्लिक करून आपल्या बागेचा नोंदणी क्रमांक व 4b क्रमांक भरल्यानंतर संबंधित द्राक्ष बागायतदारांना आपल्या बागेचा द्राक्ष तपासणीचा अहवाल डाऊनलोड करुन घेण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. निर्यातक्षम द्राक्षाच्या नमुन्याची तपासणी करण्याकरिता 268 औषधांची एम आर एल सहित प्रपत्र- 9 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे

सन 2022 – 23 मध्ये ग्रेपनेट द्वारे 60000 निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्याचा लक्षांक जिल्हानिहाय वितरीत करण्यात आला असून त्यानुसार सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कार्यवाही करावी. चालू वर्षी द्राक्ष बागायतदारांनी आपल्या बागांची वेळेत नोंदणी करून लेबल क्लेम प्रमाणे औषधांचा वापर करून निर्याती बरोबरच स्थानिक बाजारपेठेतील ग्राह

कांनाही चांगल्या दर्जाचे व कीडनाशक उर्वरित अंश मुक्त द्राक्ष पुरवठा करून त्याद्वारे आपल्या मालास अधिक मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक , कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच आयुक्तालय स्तरावर कृषी निर्यात कक्षाशी संपर्क साधण्यात यावा.डॉ.कैलास मोते संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम