कृषी उन्नती योजनेंतर्गत बियाणे व लागवड साहित्य ग्राम बिजोत्पादन योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ ऑक्टोबर २०२२ | रब्बी हंगाम सन २०२२-२३ मध्ये कृषी उन्नीत योजना अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य अंतर्गत ग्राम बिजोत्पादन योजना गहू व हरभरा या पिकांकरीता जळगांव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदरील योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज 1 योजना अनेक या विषयीचे पोर्टल वर बियाणे या घटकासाठी अर्ज करावयाचा आहे. सदरील योजनेतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत आहे. कृषि विभागाने Mahadbt Farmer नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार केलेले आहे. शेतक-यांनी त्यांच्या स्वतच्या Android स्मार्ट मोबाईल वरून गुगल प्ले स्टोरवर जाऊन Mahadbt Farmer हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्यावे सदर सुविधा वापरकर्ता हि आय डी व आधार क्रमांक आधारित असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाईल असणा-या शेतक-यांच्या मोबाईलवर सदर अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यास अनेक लाभार्थी त्यावरून कागदपत्रे अपलोड करु शकतात. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात. तसेच या मध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या ईमेल वर किंवा 020-25511479 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शेतक-यांना करण्यात येत आहे. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी Mahadbt Farmer या मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करून त्याची कागदपत्रे लवकरात लवकर अपलोड करावीत जेणे करुन अनुदान वितरण प्रक्रिया जलद होईल. सदरील योजनेंतर्गत गहू व हरभरा पिकाचे बियाणे महाबीज च्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत संबंधित पिकाचे प्रमाणित बियाणे अनुदानित दराने वितरीत करण्यात येणार आहे. जळगांव जिल्हयात हरभरा पिकासाठी 10 वर्ष आतील वाणांसाठी 2625 क्विंटल व 10 वर्षावरील वाणांसाठी 2751 क्विंटल असे एकूण 5376 क्विंटल हरभरा पिकाचे व गहू पिकाचे 10 वर्षा आतील वाणाचे 417 क्विंटल व 10 वर्षावरील वाणांचे 2383 क्विटल असे एकूण 2800 क्विंटल बियाणे वितरीत करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक व जिल्हा व्यवस्थापक महाबिज व त्यांचे क्षेत्रिय कार्यालय व अधिकृत वितरक यांचेशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम