हिरव्या मिरचीचा ठसका कायम

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | दिवाळीच्या काळात मागणी असणाऱ्या हिरव्या मिरचीची आवक कमी झाल्यामुळे तिचा ठसका अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर बाजार समिती वगळता इतर बाजारांमधील आवक ही सरासरी १० क्विंटलपेक्षाही कमी असल्याचे दिसून येत आहे.

बाजारात हिरव्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. हिरव्या मिरिचीचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहणार असल्याचा दावा भाजीपाला व्यावसायिकांनी केला आहे. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाक घरात लागणाऱ्या हिरव्या मिरचीचा ठसका जिवन्त आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम