दिवाळीनंतरही हरभऱ्याचे दर अद्याप स्थिर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | सध्या हरभऱ्याला ४ हजार २०० ते ४ हजार ८०० रुपये दर मिळत असून मागील काही महिन्यांपासून हरभऱ्याचा हा दर स्थिर आहे. हरभरा दरात सुधारणा झाली नसल्याने शेतकऱ्यांसह प्रक्रिया करणारे उद्योगही अडचणीत आले आहेत

देशातला हरभरा बाजार सुरुवातीपासूनच स्थिर राहिल्याने या काळात हरभरा डाळ आणि बेसनला मागणी वाढली होती. परंतु उद्योगांनी खरेदी गरजेप्रमाणे केल्याने हरभऱ्याला चांगला भाव मिळू शकला नाही .

paid add

त्यातच यंदा ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. परंतु ऐन पेरणीच्या काळातही हरभरा दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांची पेरणीला कमी पसंती मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी चांगला दर मिळणाऱ्या पिकांकडे आकर्षित ते होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम