कृषीसेवक | ५ ऑक्टोबर २०२३
देशभरात अनेक फळ विक्रीस येत असतात त्यातील एक म्हणजे सफरचंद. तुम्ही आजपर्यंत लाल आणि हिरव्या कलरची सफरचंद पाहिली आहेत. पण तुम्ही कधी काळे सफरचंद पाहिले आहे का? होय, काळ्या कलरचे सफरचंद. सफरचंदांच्या अनेक जाती आहेत, ज्यांची चव आणि गुण देखील भिन्न आहेत. या काळ्या सफरचंदाला देखील कायम चांगला दर असतो. आज आपण या ‘ब्लॅक डायमंड अॅपल’ बद्दल माहिती पाहणार आहोत.
ब्लॅक डायमंड अॅपल खूप दुर्मिळ आहे. जगाच्या काही भागातच या ब्लॅक डायमंड अॅपलची शेती होऊ शकते. या सफरचंदाच्या वाढीसाठी विशेष हवामानाची आवश्यकता असते. ब्लॅक डायमंड सफरचंद भूतानच्या टेकड्यांमध्ये पिकवले जाते. सफरचंदाच्या या जातीला ‘हुआ निऊ’ असेही म्हणतात. या सफरचंदाच्या चवीबद्दल सांगायचे तर त्याची चव रसाळ असते.
ब्लॅक डायमंड सफरचंद आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. त्यात उच्च विरघळणारे फायबर असते. जे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयरोग रोखण्यासाठी फायदेशीर आहे. ब्लॅक डायमंड सफरचंद खाल्ल्यामुळं अन्न पचन होण्यास मदत होते. ब्लॅक डायमंड सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए तसेच पोटॅशियम असते. ब्लॅक डायमंड अॅपलमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असते, ते शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. ब्लॅक डायमंड सफरचंद खाणं आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असते.
या सफरचंदाच्या खरेदीसाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते. एका सफरचंदासाठी तुम्हाल 500 रुपये द्यावे लागतात. त्याच्या किंमतीत सतत बदलत राहतात. ब्लॅक डायमंड अॅपलच पिक वाढवण्यासाठी अत्यंत काळजी आणि विशेष कौशल्ये आवश्यक असते. याशिवाय उत्पादनाच्या बाबतीत हे सफरचंद इतर सफरचंदांच्या तुलनेत कमी वाढते. त्यामुळं ब्लॅक डायमंड सफरचंद खूप महाग आहे. काळ्या सफरचंदाच्या झाडाला फळ येण्यासाठी 8 वर्षे लागतात.
जगात सफरचंदांच्या 100 हून अधिक जाती आढळतात, त्यापैकी एक म्हणजे ‘ब्लॅक डायमंड अँपल’. सफरचंदाची ही एक दुर्मिळ जात आहे. जी सर्वत्र सहज उपलब्ध नसते. ते कोठेही पिकवता येत नाही. हे काळ्या रंगाचे सफरचंद तिबेटच्या टेकड्यांवर उगवले जाते. येथील रहिवासी या फळाला ‘हुआ निऊ’ या नावाने ओळखतात.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम