भेंडी महत्वाचे भाजीपाला पीक

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १ नोव्हेंबर २०२२ | उन्हाळी हंगामात घेतले जाणारे भेंडी हे महत्वाचे भाजीपाला पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच भेंडी मध्ये केरोटीन पोटॅशिअम मॅग्नेशिअम फॉलिक ऍसिड असे अनेक पौष्टीक घटक आहेत.त्यामुळे बाजारात भेंडीला वर्षभर मागणी असते.त्यामुळे भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते.

हवामान :-
भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त.
लागवडीचा कालावधी –
खरीप: जून- जुलै, रब्बी : थंडी सुरु होण्यापूर्वी आणि
उन्हाळी : १५ जाने-फेब्रु

जमीन:-
भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर करावा.

जाती :-
अंकुर ४०,पुसा सावनी,महिको १०,परभणी क्रांती,वर्षा, अर्का अनामिका,सिलेक्शन २-२,फुले उत्कर्षा,या सुधारित जाती लागवडीस योग्य आहेत.
* अंकुर ४० :- सरळ वाढणारी जात.पेरांमधील अंतर कमी फळे हिरवी.व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन.
* महिको १० :- अधिक लोकप्रिय जात.फळे गर्द हिरवी.व्हेक्टरी १०-१२ टन उत्पादन.
* वर्षा :- अधिक लोकप्रिय जात.लांबी ५-७ सेमी फळे हिरवी व लुसलूशीत तोडल्यानंतर काळी पडत नाहीत.व्हेक्टरी १० ते १२ टन उत्पादन.
* पुसा सावनी :- आय.ए. आर.आय विकसित जात फ़ळे १०-१५ से.मी लांब हिरवी मुलायम झाडावर काटेरी लव देठावर तांबूस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका,सुरुवातीला येलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक परंतु सद्या व्हायरस रोगास बळी पडते. व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन.
* परभणी क्रांती :- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित जात. फळे ७-१० सेमी लांब हिरवी पुसा सावनी पेक्षा कणखर व व्हायरस रोगास प्रतिकारक,फळे नाजूक तजेलदार हिरवी.पेरणी पासून ५५ दिवसात पहिला तोडा सुरु होतो. उन्हाळ्यात १४-१६ तोडे तर खरिपात २० तोडे होतात.व्हेक्टरी ७-८ टन उत्पादन.
* अर्का अनामिका :- झाड उंच फळे लांब कोवळी हिरवी, फळाचा देठ लांब. व्हायरस रोगास प्रतिकारक. फळे तोडण्यास सोईस्कर.व्हेक्टरी ९-१२ टन उत्पादन

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम