कोरफडीची लागवड करून मिळवा उत्पन्न

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १ नोव्हेंबर २०२२ | कोरफड ही वनस्पती कुमारी, कुवारकांड या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे. लिलियाशी या कुळातील ही बारमाही उष्णदेशीय वनस्पती असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. आफ्रिका, अरबी द्वीपकल्प, दक्षिण आशिया येथे उगवणारी ही एक बहुवार्षिक औषधी वनस्पती आहे. आफ्रिका, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे कोरफडीचे उत्पादन करण्यामध्ये अग्रेसर देश आहेत. या वनस्पती मुख्यत: कॉस्मेटिक कंपन्या, औषधी, अन्न इत्यादी मध्ये प्रामुख्याने वापरल्या जाते.
पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने येतात.

 

हवामान –
कोरफड हे एक उबदार उष्णकटिबंधीय पिक असल्याने कोरफडीला उष्ण व कोरडे हवामान अनुकूल असते. हि वनस्पती विविध प्रकारच्या वातावरणामध्ये जगू शकते. कमी पाउस पडणाऱ्या क्षेत्रात तसेच उबदार दमट वातावरणामध्ये ही वनस्पती चांगल्या प्रकारे येऊ शकत असल्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात याची लागवड करता येते. अत्यंत थंड प्रदेशामध्ये ही वनस्पती तग धरू शकत नाही.

जमिन –
कोरफड ही विविध प्रकारच्या मातीमध्ये लागवड करता येते. तथापि, हलकी ते मध्यम, वालुकामय व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास उत्तम असते. पाणी साठून राहणारी जमीन या पिकासाठी अत्यंत संवेदनशील आहे. चांगला निचरा केलेल्या काळ्या कापसाच्या मातीमध्ये या पिकाची वाढ लवकर होते. जमिनीचा सामू ८.५ च्या वर असल्यास तसेच खारट जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू नये. टांगलेले कोरफडीचे रोप मातीशिवाय नुसत्या हवेमध्ये जगू शकते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम