फटका : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण ; ५० रुपये मिळतोय कॅरेटचा दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ४ जानेवारी २०२३ । टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. कारण मातीमोल दरानं टोमॅटोची विक्री (Tomato Price) होत आहे.

एकेकाळी 400 ते 500 रुपयांना विक्री होणारे टोमॅटोचे कॅरेट आता 50 रुपयांना विक्री होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. दरात घसरण झाल्यामुळं टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं वर्धा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बाजारात कवडीमोल दरानं टोमॅटोची विक्री होत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी-मुंगापूर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतातील टोमॅटो चक्क गुरांपुढे टाकले आहेत. टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे. सततच ढगाळ वातावरण आणि बाजारात टोमॅटोची वाढलेली आवक यामुळं एकेकाळी चारशे ते पाचशे रुपयांना जाणारं टोमॅटोचं कॅरेट आता 50 रुपयांना विकलं जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम