बाजारात ‘या’ पेरूला मोठी मागणी : घरबसल्या मिळवाल लाखो रुपये !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १८ नोव्हेबर २०२३

देशातील बाजारात मोठ्या प्रमाणात पेरूला मोठी मागणी असते. तसेच पेरूचे अनेक प्रकार असून यातील एक म्हणजे मोठ्या आकाराचे पेरू खूप पसंत केले जात आहेत. या पेरूंना देखील बाजारात मोठी मागणी आहे. एका पेरूचे वजन दीड किलोपर्यंत पोहोचले असून त्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा चंगळ फायदा होत आहे. हा विशाल पेरू दिसायला तर सुंदरच आहे, पण त्याची चवही उत्तम आहे. हरियाणातील जिंद येथील प्रगतशील शेतकरी सुनील कंडेला हे त्याचे बागकाम करत आहेत. याबाबत बोलताना सुनील म्हणाले की, त्यांना मार्केटिंगसाठी बाजारात जाण्याची गरज नाही. कारण हे फळ घरबसल्या ऑनलाइन विकले जावू शकते तर याला १५० ते २५० रुपयांपर्यंत विक्री होत असते. यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.

paid add

सुनील कंडेला म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी त्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पेरू बागायती सुरू केली. त्यांच्या पेरूच्या खास जातीने त्यांच्या आयुष्यात उत्पन्नाचा महापूर आणला आहे. सुनील म्हणाले की, एक एकर बागेत थाई पेरू जातीची सुमारे 400 झाडे असून, त्यांना वर्षातून दोनदा फळे येतात. एका झाडापासून एका वर्षात 50 ते 60 किलो पेरूचे उत्पादन मिळते. सुनील त्यांच्या 1 एकर पेरूच्या बागेतून सुमारे 20 टन उत्पादन घेतात, ज्यातून त्यांना किमान 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये त्यांना एक लाख रुपयांपर्यंत देखभालीच्या स्वरूपात खर्च करावा लागतो. अशाप्रकारे त्यांना त्यांच्या 1 एकर शेतीतून एका वर्षात 07 लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.

साधारणपणे 04 ते 05 पेरूंचे वजन एक किलो असते, तर सुनील यांनी पिकवलेल्या जंबो आकाराच्या पेरूचे वजन 01 किलोपेक्षा जास्त असते. तीच गोष्ट, तीच किंमत. फक्त एक पेरू त्याचे वजन आणि गुणवत्तेनुसार 150 ते 250 रुपयांपर्यंत विकला जातो. त्यांच्या पेरूबद्दल त्याच्या परिसरातील लोक बोलतात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम