कृषीसेवक | ११ ऑक्टोबर २०२३
देशभर आता सणासुदीच्या दिवसात अनेक कार्यक्रमामध्ये फुलांची मोठी मागणी होत असते. त्यामुळे साहजिकच फुलांचे उत्पन्न घेणारे शेतकरी उत्साही असतात व आर्थिक नियोजन देखील मोठे करीत असतात पण आपल्या शेतात कोणत्या फुलांची लागवड करावी हे मात्र अनेक शेतकऱ्यांना वेळेनुसार समजत नसल्याने मोठा फटका देखील बसू शकतो.
वॅलेंटिने डे ला तर गुलाबाला उचांकी दर मिळत असतो . गुलकंद , अत्तर ,गुलाबजल यासाठी देखील गुलाबाच्या फुलांची वापर होत असतो. जगभरात होणाऱ्या फुलांच्या उलाढालीमध्ये एकट्या गुलाबाचा वाटा ३५ ते ४० टक्के आहे . गुलाब फुलांची शेती हा शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. गुलाब लागवडीसाठी जमीन कशी असावी – गुलाब लागवडीसाठी जमीन हि मध्यम स्वरूपाची असावी जेणेकरून अतिपाऊस झाला तरी पाण्याचा निचरा झाला होईल .जमिनीचा सामू हा ६ ते ७.५ असायला पाहिजे .गुलाब हे झुडूप वर्गीय असल्याने एकदा लागवड केल्यानंतर ५ ते ६ वर्ष टिकते .गुलाब हे बाराही महिने येणारे पीक आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही त्याची लागवड करू शकता .पावसाच्या पाण्याच्या उपलब्धीनुसार जानेवारी -फेब्रुवारी किंवा जुने -जुलै मध्ये लागवड करू शकता.
कलमांची निवड – लागवडीसाठी स्वतः तयार केलेली कलमे निवडावीत तसेच कलमे निरोगी हव्या. निवडलेले कलम हे ४ ते ६ महिने वयाचे असावे.गुलाबाच्या २० हजारांहून जास्त जाती लागवडीखाली आहेत तरी योग्य जात निवडावी. आपल्या हवामानात आणि जमिनीत चांगली वाढणारी, आकर्षक तसेच दर्जेदार फुलांचे उत्पादन देणारी जात निवड करावी. ग्लॅडिएटर, रक्तगंधा, अर्जुन, सुपरस्टार, लेडी एक्स, पापा मिलन, ब्लू मून, डबल डिलाइट, पॅराडाइज, ख्रिश्चन डायर, ओक्लोहोमा, अमेरिका हेरिटेज, लॅडोस, पीस या जातींना बाजारात मोठी मागणी आहे.
जातींची विभागणी – हायब्रिड टी : लांब दांड्याच्या फुलासाठी याची लागवड करतात.एका फांदीवर १ ते ३ लांब दांड्याची फुले येतात. या प्रकारातील फुले मोठी, आकर्षक, काही दुहेरी रंगाची असतात. यामध्ये गॅडिएटर, सुपरस्टार, डबल डिलाईट, पीस, ॲम्बेसॅडर, ब्लू मून, फस्ट प्राईज, पापा मिलन, समर सनशाईन, लॅंडोरा, डॉ. होमी भाभा या जातींचा समावेश होतो. बागेत लावण्यासाठी – जास्त फुले देण्याची क्षमता असलेल्या फ्लोरीबंडा, मिनिएचर व हायब्रीड टी प्रकारातील काही जातींची निवड करावी. बागेत लागवडीसाठी जोमदार वाढणाऱ्या, आकर्षक रंगाची जास्त फुले असलेल्या, जास्त काळापर्य पास्ता, कोरोना, डॅनिश गोल्ड, रॉबिनसन, ऑल गोल्ड, युरोपिआना. सजावटीसाठी – पाकळ्यांची विशिष्ट ठेवण असलेल्या फुलांचा आकर्षक आकार, रंग व सुवास असलेल्या, पाने तजेलदार व दांडा लांब असलेल्या या जाती असतात, त्याची व्यापारी तत्त्वावर लागवडही करतात. ग्लॅडिएटर, सोनिया, रक्तगंधा, अर्जुन, डबल डिलाईट, लॅडोरा, टिकाने, सुपरस्टार, इलोनी, मर्सडिस, पापा मिलन, लेडी एक्स, ब्लू मून या जाती सजावटीसाठी वापरल्या जातात.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम